रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ - लेख सूची

जागतिकीकरण आणि लैंगिकताविषयक बदल

जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा आणि प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत झाला आहे, हे माझ्या प्रतिपादनाचे प्रमुख सूत्र आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचे पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे. नवे पर्व, नवे प्रश्न नव्वदचे दशक आले. खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खाउजा) पर्व सुरु झाले आणि सर्व काही …

पूर्णविराम की स्वल्पविराम ?

आजचा सुधारक’चा हा अंतिम अंक वाचकांपुढे सादर करताना मनात संमिश्र भावना दाटून आल्या आहेत. एकीकडे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विवेकवादाचे निशाण फडकवीत ठेवण्याचा एक प्रामाणिक आणि प्रगल्भ प्रयत्न काळाच्या पडद्याआड जात आहे ह्याचे आत्यंतिक दुःख आहे, तर दुसरीकडे अशा प्रयत्नाच्या प्रासंगिकतेची लख्ख मोहर जाणत्यांच्या मनावर उमटल्याचे समाधानही आहे. वैचारिक नियतकालिकाची वाटचाल नेहमीच खडतर असते. आमचे मूल्यमापन …

धर्म: परंपरा आणि परिवर्तन (भाग ३)

प्रत्येक धर्मात परंपरा व नवतेचा संघर्ष सुरू असतो व तो कधीही निर्णायक असत नाही. त्यामुळे धर्माला कालसंगत बनविण्याची लढाई प्रत्येक पिढीला विविध पातळ्यांवरून लढावीच लागेल असे प्रतिपादन करणाऱ्या ह्या लेखमालेत आतापर्यंत हिंदू व ख्रिश्चन धर्मांचा आपण विचार केला. ह्या लेखात मुस्लिम धर्मातील मूलतत्त्ववादी विरुद्ध उदारमतवादी ह्या ऐरणीवर आलेल्या लढ्याचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे.—————————————————————————–इतर कोणत्याही धर्माप्रमाणे …

धर्म: परंपरा आणि परिवर्तन (भाग २)

ख्रिश्चन धर्म, रोमन कॅथॉलिक, पोप फ्रान्सिस —————————————————————————- प्रत्येक धर्मातील परंपरा व परिवर्तन ह्यांच्यातील संघर्षाचा वेध घेणाऱ्या लेखमालेतील कॅथॉलिक पंथातील ह्या प्रक्रियेचे चित्रण करणारा व त्यातील पोप फ्रान्सिस ह्यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारा हा लेख.. —————————————————————————– हिंदू धर्माच्या मोकळ्याढाकळ्या रचनेमुळे, अनेकेश्वरी उपासनापद्धतींमुळे व सर्वसमावेशक लवचिकतेमुळे त्यात परंपरा आणि परिवर्तन ह्यांमधला लढा दीर्घकाळ चालत राहू शकला. इंग्रजी राजवट …

धर्म: परंपरा आणि परिवर्तन (भाग १)

धर्म, मूलतत्त्ववाद, जागतिकीकरणप्रत्येक धर्मात गेली अनेक शतके कट्टरपंथी वि. सुधारणावादी हा संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष समजावून घेणे हे आपला भूतकाळाचा अन्वयार्थ लावण्यासाठी, वर्तमानातील कृती ठरविण्यासाठी, तसेच भविष्याचा वेध घेण्यासाठी आवश्यक आहे. हिंदू, ख्रिश्चन व मुस्लीम धर्मात ह्या संघर्षाचे स्वरूप कसकसे बदलत गेले, ह्याचा मागोवा घेणाऱ्या लेखमालेचा हा पहिला भाग—————————————————————————–मानवी इतिहासात विसाव्या शतकाचे महत्त्व अनन्यसाधारण …

संपादकीय विवेकवाद व्यापक करू या!

संपादकीय विवेकवाद व्यापक करू या! रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला एक महिना उलटून गेला. अद्याप त्यांच्या खुन्याबद्दल कोणताही महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हातात लागलेला नाही. ‘पोलिस तपास जोरात सुरू आहे’ ह्यापलीकडे शासन काहीही बोलायला तयार नाही. आतापर्यन्तच्या पोलिस तपासाचा निष्कर्ष – दाभोलकरांचा खून सुपारी देऊन करण्यात आला-एव्हढाच आहे. हे सांगायला पोलिस कशाला हवेत ? …

संपादकीय दिवस कसोटीचे आहेत

साप्ताहिक साधनाचे संपादक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व प्रमुख डॉक्टर नरेंद्र अच्युत दाभोलकर ह्यांची ज्या प्रकारे पुण्यात हत्या झाली, तो प्रकार अखिल महाराष्ट्राला अत्यंत लांछनास्पद आहे. विचाराचा आणि विवेकाचा झेंडा घेतलेले महाराष्ट्रात जे काही थोडके लोक आहेत, त्यांच्यामध्ये दाभोलकरांचा क्रमांक वरचा होता. अंधश्रद्धेचे विरोधक आणि विवेकवादी असल्यामुळे ते एका अर्थी आ.सु. परिवारातलेच होते. त्यांच्यावरील …

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गांधीविचार

शिांतिवन कुष्ठधाम ह्या गांधीवादी संस्थेत काही महिन्यापूर्वी रा. स्व. संघाची उच्चस्तरीय बैठक पार पडली व तीत मोहन भागवतांपासून ते तोगडियांपर्यंत अनेक नेते हजर होते ह्या बातमीने सध्या सर्वत्र खळबळ माजवली आहे. महत्त्वाची बाब ही की त्यामुळे गांधीवादी संस्था व संघपरिवार ह्यांच्या परस्पर-संबंधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुळात गांधींचे रामराज्य व संघाचा हिंदुत्ववाद ह्यांतील मूलभूत फरक …

वाढता हिंसाचार आणि स्त्री-पुरुष संख्येतील असमतोल

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या निमित्ताने देशभर जो असंतोषाचा आगडोंब उसळला, ती समाजहिताच्या दृष्टीने एक चांगली बाब आहे असे मी मानतो. आपला समाज अजून जिवंत असल्याची ती खूण आहे. व्यवस्थेविषयीचा सामूहिक असंतोष अशा निमित्ताने उफाळून बाहेर येतो. त्याला योग्य वळण देणे ही समाजधुरीणांची व सामाजिक आंदोलनाच्या नेत्यांची जबाबदारी आहे. गेल्या वर्षी अण्णा हजारेंच्या (व काही प्रमाणात केजरीवालांच्या) …

विज्ञान, तंत्रज्ञान व गांधीजी

“यंत्रसामुग्री हे आधुनिक समाजाचे मुख्य प्रतीक आहे. ते खूप मोठे पाप आहे.” “नई तालीम ह्या माझ्या योजनेमध्ये अधिक चांगली ग्रंथालये, प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था असतील. रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि इतर तज्ज्ञ ह्यांची फौज असेल. हे लोक राष्ट्राचे खरे सेवक असतील आणि आपले हक्क व गरजा ह्यांच्याबाबत सजग झालेल्या जनतेच्या विविध आणि वाढत्या गरजांना ते पुरे पडतील. …

पुरुषांच्या नावे एक खुले पत्र

प्रिय सद्गृहस्थहो, आमच्याविषयी व आमच्या उद्दिष्टांविषयी आपण आपल्या मनात काही गैरसमज बाळगून आहात, असे आमच्या निदर्शनास आले आहे. आपण सर्व एकत्र येऊन एक अधिक संतुलित समाज बनविण्याच्या कामात या गैरसमजुती व काही तद्दन खोट्या गोष्टींमुळे अडथळा निर्माण होतो. आपल्या मनातील हे अपसमज-गैरसमज दूर करावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. कृपया तसे करण्याची संधी आम्हाला द्यावी. …

डार्विनच्या शोधाची एकशेपन्नास वर्षे

येत्या जून-जुलैच्या सुमारास वरील विषयावर विशेषांक काढायची योजना आहे. त्यासाठी नियोजित अतिथि-संपादक, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ह्यांनी घडवलेले पत्र सोबत देत आहोत. हे पत्र अनेक तज्ज्ञांना तर पाठवले जात आहेच, परंतु आसु च्या लेखकांपैकी कोणास लिहिण्याची इच्छा असल्यास त्यांनी अतिथि-संपादकांशी संपर्क साधावा या हेतूने हे पत्र देत आहोत. संपर्काचा पत्ताः रवींद्र रु. पं., ८ आदर्शनगर, शिरपूर …

श्रीकांत कारंजेकरः निर्वैर, निराग्रही, निःसंग

श्रीकांत कारंजेकरची माझी मैत्री चांगली एकोणतीस वर्षांपासून आहे. १९८२ च्या सप्टेंबरमध्ये मी वर्ध्याच्या ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रात दाखल झालो, तेव्हा पहिली मैत्री श्रीकांतशीच झाली. नंतर माझ्या आग्रहावरून तारक काटेही तिथेच आला. श्रीकांत मी तारक असे अभेद्य त्रिकूट इतकी वर्षे होते, त्यामुळे आम्ही परस्परांना गृहीत धरायला सुरुवात केली होती. मी वर्धा सोडून मुंबईला गेलो; सव्वीस वर्षे तिथे …

श्रीकांत कारंजेकरः निर्वैर, निराग्रही, निःसंग

श्रीकांत कारंजेकरची माझी मैत्री चांगली एकोणतीस वर्षांपासून आहे. १९८२ च्या सप्टेंबरमध्ये मी वर्ध्याच्या ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रात दाखल झालो, तेव्हा पहिली मैत्री श्रीकांतशीच झाली. नंतर माझ्या आग्रहावरून तारक काटेही तिथेच आला. श्रीकांत मी तारक असे अभेद्य त्रिकूट इतकी वर्षे होते, त्यामुळे आम्ही परस्परांना गृहीत धरायला सुरुवात केली होती. मी वर्धा सोडून मुंबईला गेलो; सव्वीस वर्षे तिथे …